अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे बेमुदत उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शाखेच्या वतीने प्रलंबित व विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरुवात झाली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा राष्ट्रीय प्रमुख महामंत्री वासुदेवराव चांगरे यांनी दिला आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,  अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसचे शाखेच्या वतीने ९ मार्च २०१९ तसेच १८ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठका झाल्या, परंतु या बैठकीत कोणताही न्याय मिळाला नाही. त्यासाठी ७ जून २०२३ रोजी राज्यातील सफाई कामगारांचा आजाद मैदान मुंबई येथे सफाई कामगारांचा जन आक्रोश आंदोलन झाले. त्यावेळी देखील मंत्री दादा भुसे यांनी शासनाच्या वतीने मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांना बैठक घेण्याचे सांगतो असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत प्रलंबित मागण्यासाठी शासनाच्या वतीने कुठलीही बैठकीचे आमंत्रण आलेले नाही. त्यामुळे आज मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

 

यामध्ये माजी आमदार दलीत मित्र वासुदेव वासुदेवराव चांगरे आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी, लाड-पागे कमिटीचे संरक्षण करण्यास राज्य शासन गंभीर आहे असे वचन द्यावे. अनुसूचित जातीच्या राखीव असलेल्या१३ टक्के आरक्षणांमधून वेगळे ५ टक्के आरक्षण मेथड वाल्मिकी समाजाला देण्यात यावे, २००५ पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना तातडीने सुरुवात करावी. दलित केंद्र मणिराम चांगरे सफाई कामगार वेल्फेअर बोर्डाची घोषणा करावी, राज्यातील नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत व नगरपरिषदांमध्ये कामगारांच्या ठेका बंद करून रोजंदारीवर लावण्यास अनुमती द्यावी, यासह प्रलंबित मागण्या चे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

Protected Content