कुंभारखेड्यात ५ लाख रुपयांच्या पेव्हर ब्लॉक कामाचे भूमीपूजन

सावदा, ता.रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील कुंभारखेडा येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते ५ लाख रुपयांच्या पेव्हर ब्लॉक कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाच्या आमदार स्थानिक विकास सन २०२०/२१ कार्यक्रम निधीतून ‘कुंभारखेडा’ गावाअंतर्गत अंदाजित सुमारे ५ लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कनिष्ठ अभियंता हेमंत महाजन, अतुल महाजन सर,युवक काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष योगेश पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, कुंभारखेडा लोकनियुक्त संरपच लतिका बोंडे, उपसरपंच गोकुळ चव्हाण, मुरलीधर राणे, प्रगतीशील शेतकरी अशोक पाटील, जगन्नाथ पाटील, पंडित महाजन, पी के बोंडे, हेमंत चौधरी, शांताराम राणे, प्रदीप पाटील, माधव चौधरी, डॉ आर के महाजन, बाळू बोदोडे, जगन्नाथ पाटील, पिंटू सोनार, राजू पाटील, प्रविण बोंडे, दगडू तडवी, सतिश पाटील, समाधान भालेराव, फिरोज तडवी, पिंटू अट्रावलकर, रविंद्र महाजन, धनू जंगले, रघुनाथ पोतदार यासह ग्रामसेवक यांची उपस्थित होती.

Protected Content