‘खाशी मंडळ’च्या निवडणूकीत बाहेरून येणाऱ्या मतदारांना प्रतिबंध घाला. – ‘भीम आर्मी’ची मागणी

अमळनेर प्रतिनिधी | येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत बाहेरील जिल्हा अथवा राज्यातून येणाऱ्या मतदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध घालण्याबाबत प्राताधिकारीसह राज्याचे आरोग्य मंत्री, जळगांव जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांना अमळनेर ‘भीम आर्मी’चे तालुकाध्यक्ष प्रवीण बैसाने यांनी निवेदन दिले.

‘अमळनेर’मधील खाशी मंडळाची निवडणूक दि.२३ जानेवारी २०२२ रोजी होऊ घातलेली आहे. या त्रिवार्षिक निवडणूकीत बहुतांश मतदार हे मतदानासाठी परराज्य आणि परजिल्ह्यातून येत असतात. राज्यभर कोरोनासह ओमीक्रोन आजाराचा वाढता प्रादुर्भाव व जनमाणसात कोरोनाची पसरलेली भिती पाहता ‘अमळनेर’मधील खाशी मंडळाच्या निवडणूकीत बाहेरून येणाऱ्या मतदारांना प्रतिबंध घालण्यात यावा अथवा मतदान दिनांकाच्या पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने योजिलेल्या नियमानुसार पंधरा दिवस अगोदर अथवा नंतर कॉरंन्टाईन करण्याची सक्ती करावी.

जेणेकरून अमळनेरकराना मोठ्या संकटातून वाचवण्यात मदत होईल. असे न केल्यास संघटना या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. याबाबत घेतलेला निर्णय संघटनेला लिखित स्वरूपात त्वरित कळवावा.” अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष प्रविण बैसाने, कृष्णकांत शिरसाट, पवन जगताप, आत्माराम अहिरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content