Home Cities जळगाव प.वि.पाटील विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना आदरांजली

प.वि.पाटील विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना आदरांजली

0
42

p.v. patil

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात आज (दि.3) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कविता व गीतांच्या माध्यमातून बहिणाबाईंना आदरांजली वाहण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अरे संसार संसार… खोप्यामधी खोपा… माय म्हणता म्हणता… अशा विविध गीतांनी विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश सुने, सूर्यकांत पाटील, सुधीर वाणी, दीक्षा गुंठे, योगिता फेगडे छात्र अध्यापिका ममता शिरसाळे यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound