बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कर्नाटकच्या चित्रदूर्ग जिल्हयातील होसदुर्गा येथे धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन सट्टेबाजीमुळे एक कुटुंब उध्दवस्त झाले आहे. ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पती दीड कोटी रुपये हारल्यानंतर कर्ज देणाऱ्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपले जीवन संपवले. तिने आपल्या पत्रात कर्ज देणाऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या पत्राच्या आधारांवर १३ लोकांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होसदुर्गातील सिंचन विभागात दर्शन बालू हा सहायक इंजिनियर पदावर कार्यरत होता. श्रीमंत होण्याच्या नादात त्याने ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये पैसे लावणे सुरू केले होते. परंतू तो या सट्टेबाजीत १.५ कोटी रूपये हरला. कर्ज घेऊन त्यांने पैसे लावले होते. तो कर्जदारांना पैसे परत करू शकला नाही. त्यामुळे कर्जदारांनी त्यांच्या पत्नीला त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नीन आपले जीवन संपवले. त्याचे पत्नीने जीवन संपवण्यापूर्वी एका पत्रात तिच्या पतीने ज्या लोकांकडून पैसे उधार घेतले होते, ते नेहमी घरी येऊन तिला त्रास देत अत्याचार करत होते. त्यांनी कुटुंबाला धमकीही दिली होती की, जर पैसे परत केले नाहीत तर ते पूर्ण कुटुंबाची बदनामी करतील. यामुळे रंजिता घाबरली आणि या त्रासाला कंटाळून तिने १९ मार्चला टोकाचं पाऊल उचलले.
दर्शनने घेतलेल्या १.५ कोटी रुपयांच्या कर्जापैकी बहुतांश लोकांचे पैसे परत केले होते. त्यानंतर फक्त ५४ लाखांची परतफेड करणं बाकी होतं. सासऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत, त्यांनी आपला जावई निर्दोष असल्याचे सांगितले आहेत. तक्रारीनुसार, दर्शन सट्टेबाजी खेळण्यासाठी अजिबात इच्छूक नव्हता. कर्ज देणाऱ्या लोकांनी त्याला आर्थिक परताव्याचं आमिष दाखवत या जाळ्यात ओढले.