महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ (व्हीडीओ)

331236 gadchirolinaxal

कुरखेडा (गडचिरोली) राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला. छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली आहे.

 

 

पुराडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दादापूर इथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. आज पहाटे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रस्ते बांधकाम जागेवर नक्षलवाद्यांनी २७ हून अधिक वाहनांना आग लावली. याच कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर अशा पन्नासहून अधिक वाहनांसह दादापूर इथल्या डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नक्षलवाद्यांनी अचानक झालेल्या या जाळपोळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

 

Add Comment

Protected Content