धक्कादायक : कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब

 

EVM

 

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक मतदार संघात सोमवारी मतदान आटोपल्यानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

 

 

कल्याण लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम आणि संबंधित सामान डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले चित्रपटगृहाच्या स्ट्राँग रुममध्ये त्याच रात्री पोहचणे अपेक्षित होते. परंतु, असे घडले नाही. सोमवारी रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आली. या भागात झालेले मतदानाचा हिशोब करताना तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन गायब असल्याचे समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे. ईव्हीएम गायब कसे आणि कुठे झाले होते? असा प्रश्न विचारत शिवसेना नेते निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी मीडियाशी बोलताना, आयोगाचे प्रतिनिधी आपल्याला योग्य सूचना देत नव्हते, असा आरोप केला आहे. तर सर्व ईव्हीएम त्याच जागेवर होती जिथे ती तैनात करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. प्रक्रियेत उशीर झाल्याने ही ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये जमा केली जाऊ शकली नाहीत,असा दावा आयोगाने केला आहे.

Add Comment

Protected Content