बनावट सोने खरे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट सोन खरे असल्याचे भासवून युनियन बँक ऑफ इंडीयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीने नकली सोने गहाण ठेवून ६० लाखांच फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी २२ जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी ६ जणांना अटक करण्यात आले आहे.

या टोळीनं नकली सोने गहाण ठेवले होते. त्याबदल्यात बँकेकडून ६० लाख रूपये घेतले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक मॅनेजरने पोलीसात तक्रार दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचा अधिकृत मूल्यांकनकार सागर कलघटगी याचाही संशयित आरोपी असल्याचे समोर आल्याने हा उलगडा समोर आला. मूल्यांकनकाराकडून बनावट सोनं खरं असल्याचं भासवून ६०लाखांची फसवणूक केली.

Protected Content