कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारवरील अज्ञात चालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनुजा अरविंद पराडसिंगे वय २८ रा. रामानंद नगर, जळगाव या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता आईला दुचाकीवर बसवून रूग्णालयात जाण्यासाठी निघाल्या. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असतांना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. त्यांनी शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी गुरूवार २९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस नाईक जुबेर तडवी हे करीत आहे.

Protected Content