मुक्ताईनगरात महाशिवरात्री निमित्त शिव पुराण व किर्तन प्रवचन पंचदिन महोत्सव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाशिवरात्रीचे औचित्य साधून येथील पुरातन संत मुक्ताई पादुका व गोपाळ कृष्ण मंदिर येथे शिव पुराण कथा व किर्तन प्रवचन पंचदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताई मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने गोपाळपुर येथील पुरातन संत मुक्ताई पादुका व गोपाळ कृष्ण मंदिर येथे पंचदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ५ ते ९ मार्चच्या दरम्यान आयोजीत करण्यात आला असून यामध्ये हभप संदीप महाराज खामणीकर हे महापुराण कथेचे वाचन करणार आहेत.

तसेच या महोत्सवात हभप पंकज महाराज मुक्ताईनगरकर, हभप दीपक महाराज निंभोरासीमकर, हभप विजय महाराज खवले मोताळा आणि हभप विश्‍वंभर महाराज तिजारे यांच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ रोजी हभप रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या किर्ततनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. याच दिवशी कुंभारखेडा येथील प्रशांत बाळू महाजन यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशांत बाळू महाजन व किरण प्रकाशराव महाजन यांनी केले आहे.

Protected Content