कळमसरे ग्रामपंचायतच्या वतीने गरजूंना समाजोपयोगी भांड्यांचे वाटप

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामपंचायत कळमसरे येथील मागासवर्गीयांच्या २० टक्के राखीव निधी मधून सन 2023/ 24 या वर्षातील निधीमधून सुमारे 60 ते 65 हजार रुपये किमतीचे समाज उपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच श्री पिंटूभाऊ राजपूत, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, लताबाई मंगल भिल, तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक श्री.भाईदास निकम, श्री मंगल भिल, श्री कैलास चव्हाण, विनोद पवार, हेमंत चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असतात त्याच्य अनुषंगाने सालावादाप्रमाणे यावर्षी देखील मागासवर्गीयांना भांड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. दरवर्षी यापुढे देखील ग्रामपंचायत मार्फत असेच उपक्रम राबविले जातील असे सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांनी यावेळी सांगितले.

Protected Content