शिरसाड ग्रामसेवकाकडून पैशांची लूट ; चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवकाने खोटे-नाटे औषधांची बिले टाकून जवळपास एक लाख रुपयांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करुन संबंधित ग्रामसेवकाकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी शिरसाड येथील रविंद्र धनगर यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. तथापि, याप्रकरणी कार्यवाही न  झाल्यास जळगाव जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

धनगर यांनी दिलेल्या  लेखी निवेदननुसार  सविस्तर असे की,शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक यांनी औषधींचे खोटे-नाटे बिल टाकून ९९०००रु.लूट केली असून डॉक्टरांची तपासणी फाइल नसतांना एन्जोप्लास्टी झालेल्या रुग्णाची औषधी खरेदी करून खोटे बिल टाकण्यात आली आहे. डॉक्टरांनी रुग्णाला १०- १० गोळ्या लिहून दिल्या आहे मात्र संबंधांनी त्या रुग्णाच्या नावे तब्बल १२० ते १८० गोळ्यांची कोठे बीले जोडून पैसे काढलेले आहे या प्रकरणात एक अजब बाब असते की, संबंधित डॉक्टरांनी एका रुग्णाला २०१७ मध्ये १५-१५ गोळ्या घेण्याचे लिहून दिले असतांना संबंधित ग्रामसेवकाने आता त्या रुग्णाच्या नावे १२० गोळ्या खरेदी करून एका ग्रा.पं. सदस्याच्या नावे खोटे बिल टाकले आहे तर एका रुग्णाला डॉक्टरांनी तीस गोळ्या घेण्याचे लिहून दिली असताना ग्रामसेवक यांनी तब्बल या रुग्णाच्या नावे ३३६ गोळ्या खरेदीचे खोटे बिल टाकले आहे तसेच तब्बल १५ रुग्णांना औषधी न देता त्यांच्या नावाने खोटे बिल टाकलेले आहे तर एका रुग्णाची एका महिन्याची औषधे २५६  रुपये देते त्या रुग्णाच्या नावाने जवळपास ५७२० रुपयांचे खोटे बिल टाकून शासनाची मोठी फसवणूक केली आहे. या प्रकाराची माहिती शिरसाड येथील तक्रारदार रवींद्र धनगर यांनी माहिती मागवली असतांना सदर प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे दिसून आलेले आहे. तरी या गंभीर प्रकाराबाबत तक्रारदार  रवींद्र धनगर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.जळगाव तसेच गटविकास अधिकारी,पंचायत समिती (यावल ) यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.

दरम्यान या तक्रारदार रवींद्र धनगर यांच्या अर्जाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये यावल पंचायत समिती स्तरावरून शिरसाड  ग्रामपंचायत कार्यालयात दि.१६ जून २०२१ रोजी चौकशी करण्यात आली असून चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे.तरी या प्रकरणाबाबत कोणती कारवाई होते याकडे तक्रारदार सह ग्रामस्थांची लक्ष लागून आहे. ग्रामपंचायतच्या मासिक सभेत विषय घेतला व लाभार्याना औषध वाटप केल्यावर प्रत्येकाच्या सह्या घेतल्या आहे. तसे कागदपत्र आमच्याकडे जमा आहेत व कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे ग्रामसेवक आर.जी.चौधरी यांनी प्रतिक्रीया दिली.

Protected Content