भुसावळ नाका मार्गावरील क्राँकिटीकरण निकृष्ट दर्जाचे; चौकशी न झाल्यास ठाकरे गट उपोषण करणार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते मार्गावरील रस्त्यावर जुना भुसावळ नाका ते महाराष्ट्र ढाब्यापर्यंत अनेक तक्रारीनंतर नुकताच शासनाच्या लाखो रुपये निधीतुन सिमेंट काँक्रिटीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. सदरील रस्ता हा निकृष्ठ प्रतिचा करण्यात आल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या वतीने करण्यात आली असुन संबंधित चौकशी करून कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात शिवसेना या पक्षाच्या वतीने यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल ते भुसावळ मार्गावरील रस्त्यावर भुसावळ जुना नाका ते महाराष्ट्र गुजरात ढाब्यापर्यंत काही दिवसापुर्वीच सिमेंट काँक्रिटचा रस्ता करण्यात आला असुन,दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुने गटारींचे काम सुरूअसतांना शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सदरचे काम हे निकृष्ठ प्रतिचे होत असल्याची तक्रार करण्यात आली होती . सदरच्या या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असतांना संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्या वतीने सदरच्या या कामाचा निकृष्ठपणा लपण्यासाठी खड्डे पडलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे लेप लावण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गोंधळामुळे हा रस्ता नेमका सिमेंट काँक्रिटचा आहे की डांबरीकरणा असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुस बांधण्यात येत असलेल्या गटारीची उंची ही शासकीय निविदा प्रमाणे आहे की याबाबत संशय निर्माण झाले असुन, या संपुर्ण कामाची चौकशी झाल्या शिवाय संपुर्ण बिलाची अदायकी करण्यात येवु नये, तसेच या संपुर्ण कामाची चौकशी त्रिस्तरीय समितीची नेमणुक करून या समितीच्या माध्यमातुन चौकशी करण्यात येवुन यात कामात दोष आढळुन आल्यास संबंधित ठेकेदारा विरूध्द नि:क्षपक्षपणे कायदयानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येइल असा ईशारा देण्यात आला आहे.

यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनावर शिवसेना (उबाठा)चे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, यावल तालुका उपप्रमुख शरद कोळी, शहर उपप्रमुख संतोष धोबी, उपसंघटक पप्पू जोशी, विभागप्रमुख सारंग बेहेडे, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख सागर देवांग यांच्या स्वाक्षरी आहेत .

Protected Content