यावल नगरपरिषदतर्फे ‘दिव्यांग निधी व कोव्हीड-१९’ सानुग्रह अनुदानाचे वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नगरपरिषदतर्फे ‘दिव्यांग निधी व ‘कोव्हीड-१९’ सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले असून यासह कोरोना संसर्गामुळे मरण पावलेले सुर्यकांत पाटील यांच्या पत्नी विद्या सुर्यकांत पाटील यांना शासनाकडून मिळालेल्या सागुग्रह अनुदानाचे ५० लाखांचे धनादेश यावल नगर परिषदचे लेखापरिक्षक नितिन सुतार यांच्या हस्ते देण्यात आले.

यावल नगरपरिषद सन २०२१-२२ चे आर्थीक वर्षाकरीता दिव्यांगासाठी ५% तरतूद रक्कम ५०,०००० रुपये इतकी असून यावल नगरपरिषदेने रक्कम ५०,४५०० रुपये इतकी रक्कम २७९ दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात प्रत्येकी २५०० – ३५०० पर्यंत जमा करण्यात आली आहे. तसेच सन २०२०-२१ या वर्षातील अनुशेष रक्कम २८,२००० रुपये असे एकूण ७८,६५०० रुपये मात्र दिव्यांग व्यक्तीच्या खातेत जमा करणेत आली आहे. दिव्यांग राखीव निधी १०० % खर्च करण्यात आली आहे.

तसेच यावल नगरपरिषदेचे कर्मचारी के सूर्यकांत धरमसिंग पाटील यांचे कोवीड १९ मध्ये निधन झाले होते त्याचे नावे सरकारकडून कोविड-१९ सानुग्रह अनुदान रक्कम ५०,००,००० रुपये प्राप्त झाले असून यावल नगरपरिषदेतर्फ त्यांच्या वारसास हि रक्कम प्रदान करण्यात आली आहे. यावल नगरपरिषदेचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांचे मार्गदर्शनाखाली उक्त कामे करण्यात आली आहेत.

याकामी मुख्याधिकारी यावल नगरपरिषद मनोज मासे, लेखापाल यावल नगरपरिषद, नितिन सुतार, लेखापरिक्षक यावल नगरपरिषद शरद पाटील तसेच कार्यालय अधिक्षक याचल नगरपरिषद, स्थापत्य अभियंता योगेश मदने, वरिष्ठ लिपिक शिवानंद कानडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content