अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात परतीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेने पारोळा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

राज्यात परतीच्या पावसाचा कालखंड वाढल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. सदर आर्थिक नुकसान भरून निघण्याची गरज प्रकर्षाने कोणाकडूनही दिसत नाही. मात्र प्रचलित नुकसान भरपाई पद्धत आणि नुकसान भरपाईची मुदत ही अत्यंत तोकडी ठरत असल्याने शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढणार आहे. शेतीस आर्थिक सुरक्षितता देणारी कोणतीच यंत्रणा आज देशात व राज्यात उपलब्ध नसल्याने झालेले नुकसान भरून देण्याची प्राथमिक जबाबदारी सरकारची ठरते पिक विमा कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचा प्रीमियम सरकार भरून पिक विमा योजनेचा गवगवा सरकार करीत असले तरी सदर योजनेतील शेतकऱ्यांचा घटता सहभाग सदर योजना कुचकामी असल्याचे स्पष्ट करीत आहे. तरी सरकारी हेक्टरी कोणत्याही कॅम्पिंग विरहित मदतही हेक्टरी पीक कर्जाच्या १२५ टक्के शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी किंवा पीक कर्ज पिढीची जबाबदारी घेऊन पीक कर्जाच्या २५ टक्के रक्कम मदत म्हणून अदा करावी जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक पत बिघडणार नाही.

ओला दुष्काळ या प्रशासकीय शाब्दिक छळास शेतकऱ्यांना न भुलवता झालेल्या नुकसानीची भरपाई किमान पीक कर्जाच्या 125 टक्के जारी करावी पर्जन्याचा पॅटर्न गत चार वर्षापासून बदललेला दिसत आहे त्यावर शाश्वत उपाय योजना म्हणून बियाणात बदल पूरक शेती यंत्रसामग्रीची उपलब्धता असे पर्याय शेतकऱ्यांसाठी खुले ठेवले नसल्याने दरवर्षी होणाऱ्या नुकसानीस सरकार जबाबदार आहे कायम नुकसान सोसण्याची आर्थिक कुवत शेतकऱ्यांची नसल्याने राज्यात दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यात वाढ झालेले दिसून येत आहे यासाठी तात्काळ उपाययोजना म्हणून आर्थिक मदत आणि शाश्वत उपाय म्हणून बियाणे बदल यांत्रिक शेतीस मुक्त परवानगी देणे जरुरी आहे. तरी सरकार व शासनाने पाहणी दौऱ्यांचा फार्स न लावता शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व झालेल्या नुकसानीची जबाबदारी समजून शासनाने त्वरित पाऊल उचलावे, असे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी नमूद केलेले आहे. यावेळी तहसीलदार श्री अनिल गवांदे यांना निवेदन देताना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, संघटक जिजाबराव वाघ, छबिलाल पाटील, अशोक पाटील, जितेंद्र राजपूत, नरेश चौधरी, दत्तात्रय पाटील, बबलू पाटील, काशिनाथ पवार, शांताराम गढरी, शरद पाटील, योगेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Protected Content