एरंडोल तालुक्यातील नागरिकांना लासिकारणात १०० टक्के प्राधान्य द्या : मनसेची मागणी

एरंडोल  प्रतिनिधी । येथील लसीकरण केंद्रावर शहर व तालुक्यातील नागरिकांना डावलून जळगाव व इतर भागातील नागरिकांना लस दिली जात असल्याने  एरंडोल तालुक्यातील नागरीक लसिकरणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत  तालुक्यातील व शहरातील नागरिकांना १०० टक्के प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी एरंडोल तालुका मनसे व शहर मनसेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.  

निवेदनाचा आशय असा की,  गेल्या चार पाच दिवसापासुन एरंडोल या ग्रामीण भागात कोविड -१९ चे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. परंतु सदर लसीकरणापासुन एरंडोल शहर व एरंडोल तालुक्यातील ग्रामस्थच वंचित राहुन जळगाव व इतर भागातील नागरीक लसीकरणाचा फायदा घेत आहेत.  एरंडोल शहर व एरंडोल तालुक्यातील नागरीक यांना ऑनलाईन प्रक्रिया ही ग्रामीण भाग असल्यामुळे व अशिक्षीत व अडाणी लोक जास्त असल्यामुळे समजत नाही. त्यामुळे एरंडोल व तालुक्यातील लोक मोठया प्रमाणावर लसीकरणपासुन वंचित राहुन कोरानाचा मोठया प्रमाणावर धोका वाढण्याची भीती बळावली आहे.   एरंडोल शहर व  तालुक्यातील लोकांना ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती देवुन त्याची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी.  तालुक्यातील व शहरातील नागरिकांना १०० टक्के प्राधान्य देण्यात यावे असे म्हटले आहे.  निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,शहराध्यक्ष गोकुळ वाल्डे,इंद्रनील पाटील,मुकेश महाजन,उपाध्यक्ष ओमकार पाटील,विखरण विभाग अध्यक्ष गणेश जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content