जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कूलमध्ये हिंदी दिवस सप्ताह ऑनलाईन साजरा करण्यात आला. हिंदी दिवस सप्ताह अंतर्गत विविध उप्रक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हिंदी दिवस सप्ताहानिमित्ताने कनक पाटील व निहालसिंह भाटिया या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले तर आसावरी बाविस्कर ,मनस्वी जोशी हिने हिंदीतील प्रसिद्ध लेखकांचे चित्र व त्यांचा परिचय करून दिला. शाळेतील हिंदी शिक्षिका कल्पना सूर्यवंशी व विद्यार्थिनी आयुषी दशपुत्रे यांनी कविता वाचन केले. ज्योती जोशी, केतकी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी शब्दकोडे विचारले तर शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया, समन्वयिका संगीता तळेले ,स्वाती अहिरराव ,अनघा सागडे. यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगून त्यांच्याशी संवाद साधला.
तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, कविता गायन, वकृत्व. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक स्वाती अहिराव ,वंदना चौधरी, संजय भगत हे होते. इयत्ता पहिली ते आठवी चे विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख कल्पना सूर्यवंशी ,अमर जंगले हे होते. तर कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यासाठी सुचिता बोरसे, ज्योती देशमुख, प्रमिला भादूपोता, अर्चना पाटील, भारती अत्तरदे. यांनी मेहनत घेतली. तांत्रिक नियोजन समाधान पाटील, निलेश बडगुजर, प्रदीप पाटील, अनिरुद्ध डावरे. यांनी सांभाळली व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.