भुसावळच्या कुणाल चौधरीला सीईटी परिक्षेत ९९.९९ टक्के

kunal chaudhari भुसावळ प्रतिनिधी । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजे म्हणजे एमएचटी-सीईटी परिक्षेत भुसावळच्या कुणाल सुभाष चौधरी याला ९९.९९ टक्के गुण मिळाले आहेत.

एमएचटी-सीईटी परिक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला. यात जळगाव येथील के. नारखेडे विद्यालयाचा विद्यार्थी कुणाल चौधरी याला तब्बल ९९.९९ टक्के गुण मिळाले आहेत. त्याला फिजीक्स व केमिस्ट्रीमध्ये ९९.९९; गणितात १०० तर बायोलॉजी ९८.५८ गुण मिळाले आहेत. अर्थात त्याला पीसीएम ग्रुपमध्ये ९९.९९ तर पीसीबी ग्रुपमध्ये ९९.९४ टक्के मिळाले आहेत. कुणाल हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचारी सुभाष चौधरी व निशा चौधरी यांचा मुलगा आहे. या यशामुळे त्याचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील आणि अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी कुणाल व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.

खरं तर सीईटीत नेमकी गुणानुक्रमे रँक दिली जात नाही. तथापि, कुणाल इतकेच अमरावतीच्या एका विद्यार्थ्याला गुण मिळाले आहेत. यामुळे हे दोन्ही जण सीईटीमध्ये संयुक्तरित्या प्रथम आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Add Comment

Protected Content