गुन्हे मागे पहूर ग्रामीण रुग्णालयाची सेवा पूर्ववत

d36b77db e597 4dfa a720 a6dcb4aa77ef

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान अधिपरिचारिकास झालेल्या मारहाणप्रकरणी आज दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्याने वादावर पडदा पडून रुग्णालयातील आरोग्य सेवागुन्हे मागे पहूर ग्रामीण रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

 

आज (दि.४) महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा परिचारक संघटनेच्या राज्य कोषाध्यक्षा सुरेखा लष्करे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट देवून झालेल्या घटनेची माहीती समजून घेतली. जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या समन्वयातून रुग्णसेवा सुरळीत सुरू करण्यासाठी संबंधितांनी परस्परांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सुचना केल्या. गोरगरीब जनतेच्या हितासाठी या प्रकरणावर तोडगा निघावा या हेतूने अधिपरिचारक आबादेव कराड यांनी मारहाणीचा तसेच सुरेखा दिपक मोहाळे (रा.वाकोद) या महिलेने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यात आला. पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या समक्ष परस्परावरील गुन्हे मागे घेतल्याने सदर प्रकरणावर पडदा पडला.

रुग्णसेवा सुरू होताच रुग्णालयात आलेल्या पाच रुग्णांवर वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपचार केले. यामुळे सर्वसामान्य नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे.दरम्यान, काल(दि.३) नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.पट्टनशेट्टी यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देवून वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना काम बंद आंदोलन मागे घेऊन आरोग्य सेवा पुर्ववत सुरू करण्याच्या सुचना केल्या होत्या. परंतू वैदयकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवल्याने वैदयकिय सेवा ठप्पच होती.

याप्रसंगी परिचारक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा माया सोलंकी, सदस्या छाया पाटील, किशोर चौधरी, विकास धनगर विनय ढाकणे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मंजूषा पाटील, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे , आरोग्यदूत अरविंद देशमुख , रामेश्वर पाटील, संजय देशमुख, पत्रकार मनोज जोशी, शरद बेलपत्रे, रवींद्र घोलप, रवींद्र लाठे, शंकर भामेरे, गणेश पांढरे, यांनी समन्वयाच्या भूमीकेतून रुग्णसेवा सुरळीत होण्यासाठी पुढाकार घेतला.

Add Comment

Protected Content