Home क्राईम कोळी पेठेतील ‘त्या’ मयताची ओळख पटली; मयत आसोदा येथील रहिवाशी

कोळी पेठेतील ‘त्या’ मयताची ओळख पटली; मयत आसोदा येथील रहिवाशी


जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोळीपेठ परिसरात एक अनोळखी व्यक्त मयत स्थितीत आढळून आला होता. त्या मयताची ओळख पटली असून आसोदा येथील रहिवाशी असून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

अधिक माहिती अशी की, शहरातील कोळी पेठ परिसरातील गोडावून जवळ एका अनोळखी ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज ८ एप्रिल रोजी आढळून आला होता. अनोळखी असल्याने पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयत हा आसोदा येथील चुडामण नारायण कोळी (वय-४५) असे मयताचे नाव आहे.  शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे.  याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound