पोलीस विभागाकडून दंगा नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

midc

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस स्टेशन, शनीपेठ पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने आज दंगा काबु योजनेची तालिम व प्रात्यक्षिके शहरातील संवेदनशिल भागात घेण्यात आली. एमआयडीसी पोलीसांनी बिलाल चौकात तर शहर आणि शनीपेठ पोलीसांनी भिलपूरा येथे प्रात्यक्षिके सादर केलीत.

याबाबत माहिती अशी की, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी पोलीसांनी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बिलाल चौकात दंगा काबु योजनेची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, प्रभारी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोउनि विशाल सोनवणे, गोपनिय विभागाचे पोहेकॉ विश्वास बोरसे, पोना ललित गवळे यांच्यासह पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी, आरसीपी आणि क्यूआरसी प्लॅटूनच्या वाहनांसह आदी उपस्थित होते. यावेळी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दंगा कसा आटोक्यात आणावा यासाठी प्रात्यक्षिके घेण्यात आली होती.

भिलपूरातही प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
शहर पोलीस स्टेशन आणि शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांनी शहरातील भिलपुरा भागात दंगा काबु योजना बाबत प्रात्यक्षिके सादर केलीत. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन, शनी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि होमगार्डचे पथक यांच्यासह 50 जणांची उपस्थिती होती.

Add Comment

Protected Content