सिध्दार्थ नगरात तरूणाला मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात तरूणाला काहीही कारण नसतांना तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, लखन समाधान सपकाळे (वय-२७) रा. सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी हा तरूण आपल्या कुटुंबियासह राहतो. कुरीयर व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लखन सपकाळे हा सिंध्दार्थ नगरातील बांधावर बसलेला असतांना तेथे मंगल सुतार (पुर्ण नाव माहित नाही) आणि अनोळखी दोन जणांनी काहीही कारण नसतांना लखन याला शिवीगाळ करून मारहाण केली. मंगल सुतार ने हातात काठी घेवून लखनच्या डोक्यात मारली. तर इतर दोघांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. प्राथमोपचार करून लखन सपकाळे यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

 

 

 

 

Protected Content