याचिका फेटाळली – राणा दांपत्याला उच्च न्यायालयाचा झटका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा – मुंबई पोलिसांनी दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणा दांपत्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हि याचिका कोर्टाने फेटाळली असून उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे.

प्रक्षोभक विधाने करीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी मुंबई /खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी तातडीने सुनावणी देखील घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार कोर्टाने तात्काळ सुनावणी घेतली. मात्र यावेळी कोर्टाने याचिका फेटाळली असल्याने राणा दांपत्याला दिलासा मिळालेला नाही.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान राणा दांपत्याला फटकारले असून दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस देण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राणा दांपत्य जबाबदार पदावर असूनही त्यांनी हे विधान केले आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवेल होईल अशी स्थिती निर्माण केली. तसंच राणा दांपत्यावरील दोन्ही गुन्हे एकाच घटनेचा भाग  असल्याचे  न्यायालयाने  अमान्य करीत  दुसरा गुन्हा रद्द करण्याची राणा दाम्पत्याची मागणीहि   फेटाळली.
अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. जबाबदार पदावर असणाऱ्यां, विशेषत: लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदरयुक्त बोलने आणि वागणे असावे असे आम्ही वारंवार म्हटले आहे. परंतु लोकप्रतिनिधीकडून कानाडोळा केला जात असल्याने त्यांच्याकडून लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाही गुन्हा असल्याने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. पोलिस कोठडीला विरोध करताना त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी विनंती राणांच्या वतीने वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार असून त्यावेळी न्यायालयाने तपास अधिकारी आणि वकिलांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

Protected Content