रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनच्या सदस्यांनी केली नववर्षाची अनोखी सुरुवात

जळगाव, प्रतिनिधी | नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक जन स्वतःसाठी काहीतरी नवीन संकल्प करतो. परंतु रोटरी क्लब मिडटाऊनच्या सदस्यांनी रेडक्रॉसच्या थँलेसिमिया अमृत योजनेअंतर्गत एका थँलेसिमियाग्रस्त बालकाला नॅट टेस्टेड रक्तपिशवीसाठी दत्तक घेऊन नविन वर्षाची सुरुवात केली.

 

रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनच्या माजी प्रेसिडेंट डॉ. उषा शर्मा आणि सुंनंदा देखमुख यांनी पूनम खोबरकर या ६ वर्षाच्या मुलीला पुढील एक वर्षासाठी नॅट टेस्टेड रक्तपिशवी विनामूल्य मिळण्यासाठी दत्तक घेतले. यांनी यापूर्वी ही एका बालकाला दत्तक घेतले होते. तसेच रोटरी क्लब मिडटाऊनच्या इतर सदस्यानी ही या दत्तक योजनेत सहभाग घेतला आहे. परंतु थँलेसिमियाग्रस्त बालकांचे आयुष्य वाढावे आणि हे सत्कार्य खंडित होऊ नये या उद्देश्याने ही योजना सुरू ठेवली. रेडक्रॉसच्या थँलेसिमिया अमृत योजनेअंतर्गत आत्तापर्यंत २१ थँलेसिमिया बालकांना दत्तक देण्यात आले आहे. या सोबतच रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनचे माजी प्रेसिडेंट किशोर सुर्यवंशी यांनी ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेडक्रॉसच्या भावस्पर्श योजनेत सहभाग घेऊन वर्षभरात एका गरजू रुग्णाला विनामूल्य रक्तपिशवी देण्यासाठी योगदान दिले. जीवनदान व भावस्पर्श योजना तसेच थँलेसिमिया अमृत योजनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन गरजू रुग्णांना मदत करावी असे आवाहन हि त्यांनी केले. याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रोटरीच्या माजी प्रेसिडेंट आणि असिस्टंट गव्हर्नर डॉ. अपर्णा मकासरे, रोटरी क्लब मिडटाऊनचे प्रेसिडेंट डॉ. विवेक वडजीकर, मनोज पाटील, रेडक्रॉसच्या उज्वला वर्मा, श्री. व सौ. खोबरकर उपस्थित होते.

Protected Content