शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जळगावात दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जळगावात दाखल झाले आहेत.

आज जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उध्दव ठाकरे यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात ते विरोधकांचा जोरदार समाचार घेणार असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी उध्दव ठाकरे हे जळगावात दाखल झाले आहेत. विमानतळावर त्यांचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, उमेदवार करण पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, विराज कावडिया आदींनी स्वागत केले.

Protected Content