नगरपर‍िषद परिसरांमध्ये व‍िशेष स्वच्छता मोहीम राबवावी – ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अस्वच्छतेचे हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणांवर स्वच्छतेसाठी व‍िशेष स्वच्छता मोहीम राबव‍िण्यात यावी. अशा सूचना ज‍िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ज‍िल्ह्यातील सर्व नगरपाल‍िका मुख्याध‍िकाऱ्यांना द‍िल्या आहेत.

ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद हे नगरपाल‍िका प्रशासनाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेत असतात. या आढाव्यात त्यांनी मुख्याध‍िकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत सूचना द‍िल्या आहेत. ज‍िल्हाध‍िकारी श्री.प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील 19 नगरपर‍िषदा आहेत. या नगरपर‍िषदांमध्ये ज‍िल्हा न‍ियोजनाच्या अंतर्गत व‍िव‍िध कामे सुरू आहेत. याकामांना मुख्याध‍िकाऱ्यांनी भेट द्यावी. कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. ज्या कंत्राटदारांनाी काम सुरू केले नाही किंवा काम सुरू केले आहे परंतु काम रखडले आहे. अशा सर्व कंत्राटदारांकडून कामास उशीर होत असल्याबाबतचे स्पष्टीकरण मागव‍िण्यात यावे. त्यांना ताबडतोब काम सुरू करण्याबाबत सूच‍ीत करण्यात यावे. मजूर, साहित्य इत्यादीसाठी योजना तपासण्यात यावी.

मालमत्ता कर वसूलीसाठी मोहीम राबव‍िण्यात यावी. यासाठी वसूली पथके तैनात करण्यात यावीत. ड‍िसेंबर 2023 अखेर 75 टक्के कर वसूली करण्यात यावे. अशा सूचना ही ज‍िल्हाध‍िकाऱ्यांनी द‍िल्या. मालमत्ता व विव‍िध कर नगरपर‍िषदांच्या उत्पन्नाचे व‍िव‍िध साधने आहेत. या करातील उत्पन्नावर नागरी सुव‍िधा देण्यात येत असतात. तेव्हा नागर‍िकांनी वेळेवर कराचा भरणा करावा. असे आवाहन ही ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Protected Content