बंद घर फोडून ऐवज लांबविणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील गणपती नगरातील सुरेश फूड वर्ड्स जवळ असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून ऐवज लांबविण्याऱ्या दोन जणांना तांबापुर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, गणपती नगर सुरेश फुड वर्ल्ड जवळ असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून ऐवज लांबविला प्रकार १८ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी जळगावात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बुधवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेढे, संदीप पाटील, संतोष मायकल यांनी तांबापुरा भागात पेट्रोलिंग करत असतांना संशयित आरोपी फरीद उर्फ बुल्ली अहमद मुलतानी रा. अजमेरी गल्ली तांबापुरा याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गणपती नगरातील सुरेश फुड वर्ल्ड जवळ असलेल्या बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही घरफोडी त्याचा मित्र संशयित आरोपी श्याम सुभाष तानसर (वय-१९) रा. रामेश्वर कॉलनी, संभाजी नगर यांनी मिळून घरफोडी केल्याचे सांगितले. घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार पंढरीनाथ नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content