अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे येथे बेकायदेशीररित्या सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदारावर वरणगाव पोलीसांनी छापा टाकून १५ हजार ४०० रूपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील हतनुर येथील लकी किरणा दुकानातून अवैधरित्या गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखू विक्री होत असल्याचा माहिती वरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दुकानावर छापा टाकला. या दुकानातून पोलीसांनी सुगंधित पान मसाला, तंबाखू आणि गुटखा असा एकुण १५ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोहेकॉ योगेश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास उत्तर चौधरी रा. हतनूर आणि नरेंद्र महाजन रा. दसनूर ता. रावेर यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी हे करीत आहे.

Protected Content