घरफोडी आणि दुचाकी चोरी प्रकरणात फरार संशयिताला परिसरातून अटक

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरफोडी आणि दुचाकी चोरी गुन्ह्यांमध्ये ६ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह चोपडा शहरातील महात्मा गांधी रोड परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल आणि चोरीच्या ३ दुचाकी असा एकूण १ लाख ४८ हजार ३७० रुपयांचा हस्तगत करण्यात आला आहे. सुरेश राजाराम बारेला वय-२५ रा. देवळी ता. वरला, जि,बडवानी मध्य प्रदेश ह.मु. सुंदरगढी चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या सन-२०१७ मध्ये दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी सुरेश बारेला हा गेल्या ६ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर जळगाव तालुका , धरणगाव, अमळनेर, चोपडा शहर आणि शिरपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासून तो फरार झालेला होता. दरम्यान या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हा चोपडा शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून संशयित आरोपी सुरेश बारेला याला चोरीच्या दुचाकीसह अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली. तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे, धरणगाव पोलीस स्टेशन, अमळनेर पोलीस स्टेशन, चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन असे प्रत्येकी १ अशी एकूण वेगवेगळे ७ गुन्ह्यांची कबुली देवून चोरीतील मुद्देमाल आणि ३ चोरीच्या दुचाकी असा एकुण एकूण १ लाख ४८ हजार ३७० रुपयांचा हस्तगत करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलीस अंमलदार कमलाकर बागुल, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, अनिल देशमुख, संदीप साळवे, पोलीस नाईक ईश्वर पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, लोकेश माळी यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Protected Content