संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनतर्फे हाथरस घटनेचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

पारोळा प्रतिनिधी । संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन राष्ट्रीय कार्यक्षेत्र जळगाव जिल्ह्याच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला असून यासंदर्भातील निवेदन जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे घडलेल्या एका खेडे गावातील एकोणाविस वर्षीय दलित तरुणीवर काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी एकदम वाईट कृत्य करुन बलात्कार केला असून तिचे हाता-पायाची हाडे मोडुन, जीभ कापली आणि तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा तिने नऊ ते दहा दिवस मृत्युशी झुंज देत असतांना अखेरीस तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. तरी अशा अत्यंत वाईट घटनेतील आरोपींना कठोरातले कठोर शासन होणेबाबत फास्ट ट्रॅक न्यायालयात सदर खटला वर्ग करुण त्या नराधमांना कमीत कमी वेळेत कठोरातले कठोर शासन व्हावे, जेणेकरुण त्या नराधमांना कडक शिक्षा झाल्यास तरुणीच्या आत्म्यास शांती लाभेल आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत. 

अशा घटना वचक बसेल यासाठी अधिकचा कडक कायदा करुन तात्काळ अमंलबजावणी करण्यात यावी. तसेच अत्याचारीत पीडित मुलगी मृत्युमुखी झाली असुन तिच्या कुटुंबांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी आज संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन राष्ट्रीय कार्यक्षेत्र जळगाव जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात यावे, यासाठी संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने आणि रविंद्र काकडे पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेने निवेदन देण्यात आले.

 निवेदन देतांना रविंद्र काकडे पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष, सुरेश पाटोळे जिल्ह्याध्यक्ष जळगांव जिल्हा आदि चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. तसेच कोरोना संसर्ग बाबत शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टशिंगचे पालन करुन सदर निवेदन देण्यात आले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.