हनुमान जयंती स्पेशल : नांदुरा येथील महाकाय ‘हनुमान’

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  गेल्या २१ वर्षांपासून ‘हनुमान नगरी’ म्हणून ओळखले जाणारे आणि जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठी १०५ फूट उंचीची महाकाय हनुमान मूर्ती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा गावातील पहूया हनुमान जयंती स्पेशल रिपोर्ट…

प्रत्येक गावातील वैशिष्टयानुसार त्या गावाची ओळख असते. अशीच नांदुरा शहराची ओळख आता देशभरात हनुमान नगरी म्हणून होत आहे. ती येथील भव्य १०५ फूट विश्वप्रसिध्द महाकाय हनुमान मुर्तीमुळे. हनुमानजी तथा श्री बालाजी ह्या देवतांचे भक्त असल्यामुळे यांचे मंदीर बनविण्याची प्रेरणा मिळाल्यानंतर मोहनराव यांनी नांदुरा शहरात १९९९ मध्ये श्री तिरूपती बालाजी संस्थान या न्यासची स्थापना केली. तिरूपती येथे दर्शनासाठी गेले असता मोहनराव यांना हनुमानची व दुसरी गरूड मुर्ती दिसून आल्यानंतर हनुमानजींची ४०-५० फुट उंच मुर्ती बनविण्याचा निश्चय त्यांनी केला. घरी आल्यावर नियोजित मुर्तीची बांधकामाची योजना सुरू झाली व खर्चाचा आढावा घेतला गेला. या मुर्तीसाठी ४० ते ५० लाख रूपये खर्च येईल, अशी योजना बनली. याचवेळी दिल्ली येथे ७९ फुट उंचीची मुर्ती बनत असल्याचे ऐकले. त्यामुळे ते स्वत: बेचैन झाले. नियोजित ४०-५० फुट उंचीची मुर्ती बनविण्याचे ऐवजी मोठी मुर्ती बनविण्याचा मानस तयार झाला व शेवटी भारतातील सर्वात उंच १०८ फुट उंचीची मुर्ती निर्माण करण्यावर ठाम मत झाले व १९९९ मध्ये भुमिपूजनानंतर बांधकामास प्रारंभ होवून ३१ ऑक्टोबर २००१ पर्यंत पुर्ण करण्यात आली.

महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यात ग्राम नांदुरा गावाचे पश्चिमेस राष्ट्रीय महामार्गावर १०५ फुट उंच महाकाय श्री हनुमानाची मुर्ती बनविली आहे. मुर्ती अतिशय सुंदर व वैशिष्ट्यपुर्ण आहे. मुर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेले तिलक लावलेले आहे. मुर्तीमध्ये १ इंच ते १२ इंच साईजचे १ हजार नग कृत्रिम डायमंड बसविलेले आहे. मुर्तीचे डोळे २७ बाय २४ ह्या आकाराचे असून मानवाचे नकली डोळे बनविणाऱ्या कंपनीत बनविले गेले आहेत. मुर्तीवर ३.५ क्विंटल फुलांचा विशाल हार रिमोटव्दारा चढविला जातो. महाकाय विशाल मुर्तीला स्नान अभिषेक करण्याची व्यवस्था असून हा अभिषेक देखील रिमोटव्दाराच केला जातो. हे जलाभिषेकचे दृष्य फारच विलोभनीय दिसते, अशी सुंदर, विविधतेने नटलेली, जगातली सर्वात या उंच मुर्तीची सन २००३ मध्ये लिमका बुक आॅफ नॅशनल रेकॉर्डसमध्ये देशात सर्वात उंच मुर्ती असल्याची नोंद झाली आहे. या महाकाय मुर्तीला लागुन मागच्या बाजुस श्री बालाजी मंदीराचे भव्य बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिर निर्माणावर सुध्दा कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे.

दर्शनासाठी मंदीरात दुरूदूरून पर प्रांतातून दर्शनार्थी येतात. पुजा, अभिषेक व दर्शन घेऊन प्रसन्न होतात. अनेक भक्तांच्या मनोकामनाही पुर्ण होतात. दर्शनार्थी, मुर्तीची भव्यता व सुंदरता पाहून मंत्रमुग्ध होतात. यामुळे आजरोजी नांदुरा शहराला हनुमान नगरी म्हणून ओळख येथील १०५ फूट भव्य अशा हनुमान मुळे मिळाली आहे.

दरम्यान, गेली 2 वर्ष कोविड च्या प्रादुर्भावमुळे हनुमान जयंती साजरी होऊ शकली नाही परंतु या वर्षी नांदुरा शहरात मोठी  हनुमानजीची 105 फूट मूर्ती उभारणारी संस्था श्री तिरुपती बालाजी संस्थान व हनुमान भक्ता तर्फे हनुमान जयंती जल्लोषात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जयंती उत्सवाचे नियोजन खालील प्रमाणे राहिल, सकाळी 6 वाजता कलशा स्थापना , हनुमानजी अर्चना पूजा ,  1008 पान ने पूजा , पंचमृत अभिषेक , सकाळी 10 वाजता हनुमानजीला 108 फूट उंचीचा हार  माल्यार्पण , सकाळी 10.30 होम हवन , दुपारी 1.30 वा. महाप्रसाद दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत   मिरवणूक , मिरणुकीमध्ये वारकरी बंधुची दिंडी , हनुमानजीच्या वेशात लहान मुले , मुलीचा आगळा वेगळा लाठी काठीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची गिनीज बुक ऑफ लिम्का मध्ये नोंद झाली आहे.

 

Protected Content