Home Cities एरंडोल वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एरंडोल पोलिसाचा निःस्वार्थ उपक्रम

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एरंडोल पोलिसाचा निःस्वार्थ उपक्रम

0
115


एरंडोल प्रतिनिधी । येथील कै. मधुकर हेमलाल बैसाणे यांचे २५ मार्च २०२१ रोजी कोरोना या आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, संचलित फूड बँकच्या माध्यमातून रस्त्यावरील निराधार आजी-आजोबांना जेवण देण्याचे कार्य सुरु केले. 

दि.२६ मे २०२१ रोजी राहुल बैसाने यांच्या वडिलांचा वाढदिवस होता आणि त्याचदिवशी फूड बँकेच्या माध्यमातून टॉवर चौक,रेल्वेस्टेशन परिसर,इच्छापूर्ति गणपति मंदिर,भंगार बाजार,नवी पेठ,सिव्हिल हॉस्पिटल मधील गरीब रुग्णांचे नातेवाईक तसेच सिंधी कॉलनी,मेहरूण परीसरातील गरीब वस्ती या भागात जेवण व मिठाई  वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जेवण वाटप करताना प्रतिष्ठान चे नकुल सोनवणे धीरज जावळे,धनंजय सोनवणे, व राहुल बैसाणे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound