‘ते’ इतिहास निर्माण करू शकत नाहीत – प्रा. प्रेमसागर

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।‘जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत’ म्हणून भारतीय संविधान आणि भारतीय स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवले पाहिजे, असे प्रा. प्रेमसागर म्हणाले. श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात आयोजित भारतीय संविधान आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

शहरातील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय संविधान व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन तर प्रमुख मार्गदर्शक  प्रा. डॉ. पी. एस. प्रेमसागर इतिहास -विभाग प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या  हुतात्मा विषयी ते असे म्हणाले की, ‘आपका बलिदान हम व्यर्थ नही होने देंगे…और..भारत की आजादी की शाम कभी होने नही देंगे..! हा नारा देऊन विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र प्रेमाचा संदेश दिला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन व मार्गदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील, कॉमर्स विभागाचे प्रमुख  एस.एल.खडसे, प्रा. पहुरकर,ग्रंथालयाचे अधिक्षक प्रा.सरोदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.साळवे, डॉ.प्रतिभा डाके यांनी केले. या कार्यक्रमामध्ये  फोटोग्राफर्सचे कार्य तेजस सरोदे व कुणाल भारंबे यांनी केले.

तसेच शुभम गायकवाड, शितल भोई, ऋषिकेश वानखेडे,सौरभ पाटील, मनीषा नारखेडे, प्रगती कोल्हे, सपना बंजारी,पुनम सोनार, भाग्यश्री जयकर, भाग्यश्री बोरोले, ज्ञानेश्वर शेळके, भुषण पाटील, प्रफुल यमनेरे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. एस अधिकारी प्रा. विजय डांगे, प्रास्ताविक प्रा. डॉ. छाया ठिंगळे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.दीपक बावस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

 

Protected Content