जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरूपौर्णिमानिमित्त बुधवारी १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता गुरूपूजन व महापूजा करण्यात आली.
गुरूपौर्णिमानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात बुधवारी १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता गुरूपूजन आणि महाआरती करण्यात आली. यासह दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला निता तिवारी, अभिलाष महाजन, राजू भांडारकर, मनोज चौधरी, दत्तात्रय सोनार, हितेश पाटील, पप्पू बडगुजार, मनोज पाटील, अमित चव्हाण यांच्यासह गावातील भक्तगत मोठ्या संख्येने उपस्थित होते.