मंत्रीमंडळ विस्ताराला लाभला मुहूर्त !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सुकतेच्या पार्श्‍वभूमिवर, एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला आता मुहूर्त मिळाल्याचे दिसून आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांनी कार्यभारी देखील सांभाळला आहे. यानंतर आता मंत्रीमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. पहिल्यांदा १२ जुलै रोजी मंत्री शपथ घेतील असे मानले जात होते. मात्र आता शपथविधी नेमका कधी होणार याची माहिती समोर आली आहे.

विश्‍वसनीय सूत्रांच्या आधारे मंत्रीमंडळाचा विस्तार हा १९ जुलै रोजी सायंकाळी होणार असून यात भाजप आणि शिंदे गटाचे १५ मंत्री शपथ घेऊ शकतात. तर उर्वरित मंत्री हे काही दिवसांनी शपथ घेण्याची शक्यता असून याबाबत टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे. तर आता मंत्रीमंडळात नेमके कुणाला स्थान मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.