महाविद्यालयीन तरूणाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला; एकाला अटक

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील एसटी बॉईज हॉस्टेल येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरूण हा रस्त्याने मित्रासोबत पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी तरूणाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका चोरट्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातील एसटी बाईज हॉस्टेल येथे योगेश राजा वळवी वय २४ रा. धडगाव जि.नंदूरबार हा तरूण शिक्षणासाठी राहत आहे. दरम्यान, शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता योगेश वळवी हा जेवण करून होस्टेल कडे पायी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी मागून दुचाकीने आलेल्या तीन जणांनी योगेशच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला. ही घटना घडल्यानंतर योगेशने दुसऱ्या दिवशी शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी सागर बापू वाघ वय २७ रा. आसोदा ता.जि.जळगाव याला रात्री १०.३० वाजता अटक केली आहे.पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.

Protected Content