परप्रांतीय तरूणाचा खून प्रकरणात एकाला अटक !

     जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींगच्या मागील शेतात सुरेश परमसिंग सोलंकी वय २६ रा. खेमला ता. शेंदवा ता. बडवाणी मध्यप्रदेश या परप्रांतीय तरूणाचा अनैतिक संबंधातून खून केल्याचा खळबळजनक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी एकाला संशयित म्हणून अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामलाल नाना बारेला रा. केरमला वलवाणी ता. वरला जि.वडवाणी मध्यप्रदेश असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

      सुरेश सोलंकी हा तरूण गेल्या दोन महिन्यांपासून जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवरील लक्ष्मी जिनींग येथे कामासाठी ठेकेदारीच्या माध्यमातून आलेला होता. याचा परिसरात तो रहायला देखील होता. या परिसरात रामलाल नाना बारेला हा देखील वास्तव्याला होता. त्याच्या रामलालच्या पत्नीसोबत सुरेश सोलंखीचे अनैतिक संबंध होते. हा प्रकार रामलाल याच्या लक्षात आल्याने मनात राग होता. १९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपासून सुरेश सोलंकी हा गायब होता. त्यामुळे त्याचा ठेकेदार यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, दुसऱ्या दिवशी शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता लक्ष्मी जिनींगच्या मागे असलेल्या भरत खडके यांच्या शेतात सुरेशचा निर्घृण खून केल्याचे समोर आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिक्षकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी रामलाल नाना बारेला याला रात्री उशीरा अटक केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.

Protected Content