पाळधी येथील जि.प. शाळेत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पहूर, ता. जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत पाळधी केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांसाठी शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेला शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना शालेय व्यवस्थापन समिती अंतर्गत येणारे रचना, कर्तव्य, जबाबदाऱ्या तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या गावातील शाळेत आपण कशा प्रकारे बदल करून उच्च व गुणवत्ता पूर्ण शिक्षण विद्यार्थी यांना देऊ शकतो, तसेच शाळेच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत व इतर ठिकाणाहून कशा प्रकारे निधी मंजूर करून घेऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे, पदवीधर शिक्षक हरीश पाटील, आकाष कोळी, यांनी मार्गदर्शक केले. तसेच या कार्यशाळेला ग्रे,मू. संजय ठाकरे, सुकदेव पाटील यांच्यासह पाळधी, सोनाला, सूनसगाव बु, व खु,  कुंभारी सिम, गोंडखेळ, देवपिंप्री, माळपिंप्री, सवतखेडा या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यावेळी कार्यशाळेला उपस्थित होते.

Protected Content