बंद घर फोडून दागिने लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्य चौक परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घराच्या बाजूला असलेले गोडाऊन फोडून दागिने लांबवणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी रामेश्वर कॉलनीतून अटक केली आहे. यातील उर्वरित दोन जण फरार आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वातंत्र्य चौकातील साईबाबा मंदिराजवळ मीरा आनंद जोशी हे वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांचे गोडाऊन आहे. चोरट्यांनी गोडाऊन फोडून ५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले होते. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे महिलेचे नातेवाईक असल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, प्रीतम पाटील, दीपक शिंदे, राहुल बैसाणे या पथकाने शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी रामेश्वर कॉलनीत सापळा रचून संशयित आरोपी तुषार विजय जाधव (वय-२५) आणि त्याचा साथीदार सचिन कैलास चव्हाण (वय-२२) दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यासोबत असलेले इतर दोन जण फरार असून त्यांचाही शोध घेणे सुरू आहे. अटकेतील दोन्ही आरोपींना जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Protected Content