पोलीसांच्या कारवाईत बैलांची सुटका

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल-चोपडा मार्गावरील एका पत्र्याया शेडमध्ये पोलीसांनी छापा टाकून १७ गोवंश जातीचे बैलाची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

यावल चोपडा मार्गावरील ख्वाजा मस्जिदच्या पाठीमागे तिन पत्री शेड मध्ये जाकीर खान साबिर खान, उस्मान शेख सुलतान , शकील खान निसार खान रा.डांगपुरा आणि अत्ताऊल्ला खान ओबेदुल्ला खान रा. खिरनीपुरा, यावल यांनी अवैधरित्या कत्तलीच्या ईराद्याने गोवंश जातीच्या गुरांना पुरेसा चार पाणीची व्यवस्था न करता अत्यंत निर्दयीपणे बेकायद्याशीररित्या बांधुन ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच शहरातील खिरनीपुरा भागात रा. अत्ताउल्ला खान यांनी गोवंश जातीचे एक बैल अत्यंत निर्दयीपणे बांधुन ठेवलीत अशी एकुण १७ गोवंश जातीचे १ लाख ५८ हजार रूपये किमतीचे बैल घरासमोर बांधुन ठेवल्याची माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत जनावरे जप्त करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कर्मचारी सुशिल गुघे व असलम खान दिलावर पठाण यांच्या फ़िर्यादीवरून चार जणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी जप्त केलेले सर्व बैलांची आरोग्य तपासणी तालुका पशु चिकित्सक आर. सी. भगुरे यांनी केली असुन या सर्व गुरांना गोशाळेत पाठवीणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार असलम खान पठान व पोलीस कर्मचारी सुशिल घुगे हे करीत आहे.

Protected Content