बलात्कारी बँक व्यवस्थापक शर्माला ४ दिवसांची पोलीस कोठडी

 

 

जळगाव : प्रतिनिधी । ब्लॅकमेल करून  विवाहितेवर सलग ३ वर्षे अत्याचार करणारा  बँक व्यवस्थापक अशोकनाथ शर्मा याला जळगावच्या न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिव कॉलनी शाखेत कर्ज प्रकरणासाठी विचारणा करणाऱ्या या महिलेला आरोपी शाखा व्यवस्थापक अशोकनाथ शर्मा याने सुटीच्या दिवशी बँकेत बोलावल्यावर कोल्ड ड्रिंक्स मधून काहीतरी पाजून तिचे भान हरपल्यावर पहिल्यांदा अत्याचार  केला होता त्यानंतर त्याने तिच्या सोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले आणि बऱ्याचदा नाशिक आणि मुंबईला बोलावून अत्याचार केले होते .

 

पोलिसांनी शर्माला मुंबईतून अटक करून जळगावच्या सत्र बयायालयात न्या . एस जी . ठुबे यांच्यापुढे हजर केले होते . दोन्ही पक्षांचा युक्तिवाद एऐकून न्यायालयाने आरोपीला ४ दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले . या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ऍड  रमाकांत सोनावणे यांनी युक्तिवादात बाजू  मांडली .

Protected Content