कानळदा येथील शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकीची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील शेतकऱ्याची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, महेश रमेश राणे (वय-४६) रा. कानळदा ता.जि.जळगाव हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीच्या कामांसाठी (एमएच १९ सीडी ६१६३) क्रमांकाची दुचाकी आहे. ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता दुचाकी त्यांनी आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी शोधाशोध केली असता मिळून आली नाही. दुचाकी चोरी प्रकरणी महेश राणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकुर करीत आहे. 

Protected Content