पुरुषोत्तम करंडकची तिसरी घंटा वाजली (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 07 at 5.34.12 PM

जळगाव, प्रतिनिधी | पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन दोन दिवसीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आज (दि. ७) भैयासाहेब गंधे सभागृह येथे हरीशभाई मिलवणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

केसीई संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या वाटचालीनिमित्त महाराष्ट्र कलोपासक, पुणे आणि मू. जे. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. मू. जे. चा विभाग सलग चौथ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे समन्वयक राजेंद्र नांगरे, केसीई संस्थेचे सदस्य प्रा. चारुदत्त गोखले, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, परीक्षक प्राजक्त, देशमुख, प्रदीप वैद्य, नितीन धनधुके उपस्थित होते. दरम्यान, ‘ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी सांगितले की, मुलांना आपले कर्तृत्व सिद्ध करता यावे  याकरिता  ही स्पर्धा आहे. या वर्षी मू. जे. महाविद्यालयाने स्वायत्तता स्वीकारल्यानंतर कुठल्याही विद्यार्थीला पदवी मिळवीण्यापूर्वी एक तरी कला आली पाहिजे, एक तरी खेळ खेळता आला पाहिजे तरच त्यांचा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असे म्हणता येईल असे सांगितले.

एकांकिकांचे वेळापत्रक…

आज (दि. ७) इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अड रिसर्च शिरपूर ‘बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून’, डॉ. बेंडाळे महाविद्यालयाची ‘इंटीरोगेशन’, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव ‘ईदी’, कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळची ‘७२ चे गणित’या एकांकिका सादर होणार आहेत.

उद्या (दि. ८ ) सकाळी १० वाजता नूतन मराठा महाविद्यालय जळगावची ‘खेळ’, ११ वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथील ‘मट्रीक ’ १२ वाजता एम.जी. एस. एम. कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडाची ‘रंगबावरी’,  प्रताप महाविद्यालय अमळनेरची ‘असणंं आणि नसणंं ’ या एकांकिका सादर होतील.

Protected Content