महिलांना सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी : प्राचार्य सुनिल पाटील

a9a31154 efc4 4bd9 9fcc 43d9151e1acc

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीचा गेल्या तिनशे वर्षाचा इतिहासात परस्त्री माते समान, असा आदर्श समाज जिवनात रुजविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भडगाव येथील सेवा निवृत्त प्राचार्य सुनिल पाटील यांनी केले. ते बालकवी ठोबरे विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित व्याख्यान मालेचे पहीले पुष्प गुंफताना बोलत होते.

 

 

येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ व विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 मे रोजी महाराष्ट्र दिवसांचे औचित्य साधुन शिवचरित्र या विषयावर जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन श्री. पाटील सर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे सचिव व वाचनालयचे अध्यक्ष प्रा.रमेश महाजन सर उपस्थित होते. प्रारंभी गडचिरोली येथे नक्शलवादीच्या हल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आपल्या सव्वा तासाचा भाषणात प्रा. पाटील यांनी शिवाजी महाराज व माता जिजाऊ यांचे क्रांतीकारी विचारा लोकांसमोर मांडले. तसेच मोगल साम्राज्यात जनतेवर झालेल्या अन्याय व अत्याचाराची माहीती दिली. त्यांनी तानाजी मालुसरे, जिवा महाले, अंसख्य मावळेंचा इतिहास सादर केला. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यांचे मोठे योगदान असल्याची भावना व्यक्त करून इतिहासातील ह्या जाणताराजा धर्माचे पालन करून राष्ट्रसेवेचा इतिहासची माहीती सादर केली.

 

 

प्रारंभी शिक्षण संस्थेचे सचिव व वाचनालयचे अध्यक्ष प्रा.रमेश महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमची रूपरेषा मांडली. ते म्हणाले की, आज आज आपल्या शाळेत 2700 विद्यार्थी असुन शिक्षक कर्मचारीचारींसह 6 0लोकाचा स्टाॅप असल्याचे नमुद करून वाचनालयात 22 हजार ग्रंथ पुस्तके असल्याची माहिती दिली. आज या स्पर्धेच्या युगात व आजची सामाजीक व्यवस्थेत दोन्ही संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान असल्याची भावना देखील व्यक्त केली. कार्यक्रमचे सुत्रसंचालन विक्रम वाचनालयचे सचिव महेश आहेराव यांनी केले. तर प्रमुख वक्त्यांचा परीचय व आभार ए. डी. पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथ.विद्यालयचे मुख्याध्यापक जिवन पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, किशोर चौधरी, आर.डी.महाजन, कैलास माळी यांनी केले. प्रसंगी असंख्य समाज बांधव व महीला वर्ग कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Add Comment

Protected Content