Home Cities जळगाव धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन

0
101

जळगाव प्रतिनिधी । धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज शिववंदन फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पाण्याच्या टँकरद्वारे स्वच्छ धुवून वंदन करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  शहरातील रेल्वे स्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला टँकरद्वारे शिववंदन फाऊंडेशनच्यावतीने पाण्याचे स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर पुतळ्याला फुले वाहून पूजन व नमन करण्यात आले. याप्रसंगी शिववंदन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ, निलेश मोझर, गणेश महाजन यांच्यासह रेल्वे स्टेशन परिसरातील नागरीक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound