‘वायईटी’ परिक्षेत ध्रुव राज्यासह जिल्ह्यात चमकला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वायईटी परिक्षेत जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ध्रुव भंगाळे याने वायईटी परिक्षेत पात्रता मिळून जिल्ह्यात प्रथम तर राज्यात २६ वा क्रमांक मिळविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ध्रुव जितेंद्र भंगाळे याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे २५ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या Prime Minister Yashsvi Entrance Test (YET) परीक्षेत पात्रता मिळवली. जळगाव जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्रात 26 वा क्रमांक मिळावीला. तो आता यंग अचिव्हर स्कॉलरशिप पुरस्कारासाठी पात्र झाला. ध्रुव हा पोदार इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता नववीत शिकत आहे. त्याला डॉ. सुपे यांचे ग्लोबल अकॅडेमी मधील मनोज फालक सर आणि विनय महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले. तरी इच्छुक विद्यार्थ्यांना जर या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर yet.nta.ac.in या संकेतस्थाळावर भेट द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content