गाळेधारकांना दिलासा – गाळे सील कारवाईस नगरविकास मंत्र्यांनी दिली स्थगिती

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मनपा प्रशासनाने थकबाकीदार गाळेधारकांवर धडक कारवाई करत भोईटे मार्केटमधील २४ गाळे सील करण्याची कारवाई केली आहे. यानंतर जळगाव महानगर गाळेधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज नगरविकास मंत्री यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. या भेटीत पुढील आदेशापर्यंत गाळे सील करण्यास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.

 

जळगाव महानगर गाळेधारक संघटनेकडून नगरविकास विभागाकडे गाळे सील प्रकरणाबाबत याचिका दाखल केली असता आज दि. १५ फेब्रुवारी रोजी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यासुनावणीत पुढील आदेशापर्यंत गाळे सील करण्याची कारवाईस स्थगिती देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सोबत संघटनेच्या मागील बैठकीत १३ सप्टेंबर २०१९ चा जीआर हा जाचक आहे. हा जाचक जीआर असून त्यात दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्तांना गाळेधारकांना त्रास देवू नका, अशा सूचना करून देखील देण्यात आल्या होत्या अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सोनवणे यांनी दिली. यानंतरही भोईटे मार्केटचे २४ गाळे सील करण्यात आल्याने जळगाव महानगर गाळेधारक संघटनेच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ही बाब नगरविकास मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. ना. शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत जीआर जाचक असल्याने यात दुरूस्ती करावयची असल्याचे सांगितले. यासुनावणीत गाळेधारकांवर कारवाई करण्याचा मनपा ठराव ४५८ ला स्थगिती देण्यात आली. तूर्त कारवाई करू नका अशा सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले  तसेच जे गाळे मनपाने सील केले आहेत ते देखील उघडण्यात यावे असे नगरविकास विभागाने सांगितले असल्याचे ते म्हणाले. या आदेशाची प्रत उद्या बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांना भेटून देण्यात येणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.  या शिष्टमंडळात आ.किशोर पाटील. जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, बंडूदादा काळे, तेजस देपुरा, राजेश कोतवाल, सुरेश आबा पाटील, राजेंद्र अण्णा पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील यांचा समावेश होता.

Protected Content