जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर करा – जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यावतीने ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि गुणवंत खेळाडू पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (एका व्यक्तीस), गुणवंत खेळाडू पुरस्कार (एक महिला, एक पुरुष, एक दिव्यांग खेळाडू) देण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘jalgaonsports.in’ या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

“क्रीडा पुरस्कारांची नियमावली २४ जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली असून ती ‘www.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दहा हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी १ जुलै २०११ ते ३० जून २०२१ या कालावधीतील, तर गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी १ जुलै २०१६ ते ३० जून २०२१ या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे.

तसेच ‘५ जानेवारी २०२२’ पर्यंत हार्ड कॉपी कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत अधिक माहिती विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय (श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव) येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.”असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content