पाचोरा येथील धनश्री कुलकर्णी ठरली ‘इंडियाज सिंगिंग सुपरस्टार’

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा येथील सोनार गल्लीत राहणाऱ्या धनश्री कुलकर्णीने दिल्लीच्या ‘इंडियाज सिंगिंग सुपरस्टार’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत ५० हजार रुपयाचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

पाचोरा येथील सोनार गल्लीत राहणारे विनोद कुलकर्णी यांची कन्या धनश्री कुलकर्णी व सिध्दी कुलकर्णी यांना लहानपणापासून गायनी आवड असून दोघंही पाचोरा शहरात विविध कार्यक्रमास सहभागी होत असतात. दिल्ली येथील एका वृत्त वाहिनीमार्फत ‘इंडियाज सिंगिंग सुपरस्टार’ ही स्पर्धा घेण्यात आली. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, दिल्ली, आसाम, बिहार, मध्य प्रदेश या राज्यातून मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेतून सुरुवातीला एकूण २० स्पर्धक घेण्यात आले होते. त्यातून १६ उत्कृष्ट स्पर्धक निवडण्यात आले. या १६ स्पर्धकातून आपल्या सुंदर गायनातून प्रभाव पाडत पाचोरा येथील धनश्री कुलकर्णी ‘इंडियाज सिंगिंग सुपरस्टार’ रली आहे.

दिल्ली येथील वृत्त वाहिनीवरील दिल्लीच्या ‘इंडिया सिंगिंग सुपरस्टार’ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल धनश्रीला पुरस्कार व रोख ५० हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल तिचं पाचोरा शहरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धि टॉप – १० मध्ये आली. धनश्री एक उत्कृष्ट गायिका म्हणून तिचे नाव लौकिक होत असतांना ”या यशात आई-वडिलांची मिळाली साथ असल्याचे” धनश्रीने सांगितले.

पाचोरा येथील सोनार गल्लीतील रुद्र मित्र मंडळाच्या वतीने यश प्राप्त केल्याबद्दल धनश्रीचे प्रकाश जडे, कैलास सोनार, सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले, मयूर सोनार, गणेश पाटील, सागर सोनवणे, चंद्रकांत पाटील, कृष्णा सोनार, तेजस येवले आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content