युवा प्रतिष्ठानच्या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

WhatsApp Image 2019 07 13 at 4.23.59 PM

पाचोरा( प्रतिनिधी ) :आषाढी एकादशी निमित्त अमोल शिंदे युवा प्रतिष्ठान आयोजित पाचोरा ते पिंपळगाव (हरेश्वर) दिंडीला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पाचोरा येथून निघालेल्या या दिंडीत जवळपास १६०० वारकऱ्यांचा समावेश होता. सकाळी ७:०० ते दुपारी १२:०० दरम्यान अमोल शिंदे यांनी २३ कि.मी. हे अंतर पायी चालून पिंपळगाव येथील गोविंद महाराज मंदिरात सर्व वारकऱ्यांच्या साक्षीने दुपारी १२:०० वाजेची आरती करून विठू माउलीकडे साकडे घातले. शिंदे यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भरपूर पिक-पाणी होऊ दे व माझ्या शेतकरी बांधवाला सुखी-समृद्ध राहू दे,असे सगळ्यांच्या उपस्थितीत साकडे घातले. याप्रसंगी कृ.उ.बा. समिती सभापती .सतीश शिंदे,पं.स.समिती सभापती बन्सीलाल पाटील, कृ.उ.बा.समिती उपसभापती ऍड. विश्वासराव भोसले,डॉ.अर्चना पाटील (पं.स.सदस्य भडगाव ), नरेंद्र पाटील (कृ.उ.बा.समिती संचालक) विष्णू अहिरे (नगरसेवक),ऍड.योगेश पाटील (मा.नगरसेवक),गणेश पाटील (भाजयुमो तालुकाध्यक्ष),सुनिल पाटील (सरपंच जारगाव),डॉ. विशाल पाटील,तसेच उपस्थित वारकरी व भाविक उपस्थित होते.

Protected Content